शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत भाजपात!

तृप्ती सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा केला होता पराभव

shivsena-mla-bala-sawant-wife-Former-mla-trupti-sawant-joins-bjp-news-updates
shivsena-mla-bala-sawant-wife-Former-mla-trupti-sawant-joins-bjp-news-updates

मुंबई: शिवसेनेचे एकेकाळचे निष्ठावंत नेते दिवंगत आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तृप्ती सावंत यांना २०१९मध्ये तिकीट नाकारून मुंबई महापालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्या पराभूत झाल्या होत्या.shivsena-mla-bala-sawant-wife-Former-mla-trupti-sawant-joins-bjp-news-updates

तृप्ती सावंत यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकांमध्येच बंडखोरी केली होती. २०१५ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार, सेनेचे निष्ठावंत नेते आणि तृप्ती सावंत यांचे पती बाळा सावंत यांचं निधन झालं.

हेही वाचा: “योगीजी, तुमच्या खोट्या राजकीय हितासाठी लोकांच्या आयुष्याशी खेळणं सोडून द्या”;काँग्रेसाचा हल्लाबोल

त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं तृप्ती सावंत यांनाच तिकीट दिलं. या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि पूर्वीचे कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणा केली होती. पण तब्बल २० हजार मतांनी तृप्ती सावंत जिंकून आल्या. शिवसेना,काँग्रेस,आणि एमआयएम अशी तिरंगी लढत झाली होती.

नारायण राणेंचा केला होता पराभव

२०१५मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभूत करणाऱ्या तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं २०१९च्या निवडणुकांमध्ये मात्र तिकीट नाकारलं. मातोश्री हे शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान असलेला कलानगर भाग ज्या वांद्रे पूर्व मतदारसंघात येतो, तिथूनच तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता.

मात्र, २०१९मध्ये त्यांना तिकीट नाकारून मुंबई पालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण त्या पराभूत झाल्या.

बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव  झिशान सिद्दिकी यांचा विजय झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here