
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या शुक्रवार (१६ जुलै,२०२१) रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होईल SSC Result 2021 Maharashtra Board अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा करोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.
यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ साली एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. एकूण आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल याबद्दलची माहिती लवकरच जाहीर करू, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आलं आहे. १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने दिले जातील. तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार
हेही वाचा
Pradhanmantri fasal Bima Yojana l पीकविमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्या; ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव
भाजपाला या बातमीने आनंद होणार नाही; पण…
बिग ‘बी’ मोठेपणा दाखवा, मनसेची अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोस्टरबाजी
महागाईविरोधात छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन; आज ७४ व्या वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास
Rijald
Ronald
Result
10 rijald
Ssc nikal
Maharashtra