शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु

Shivsena former-minister-of-state-arjun-khotkar-corona-positive-jalna
अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह Shivsena former-minister-of-state-arjun-khotkar-corona-positive-jalna

जालना : जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

लोक संकटात असतांना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करतांना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.” अशी फेसबुकवर खोतकर यांनी माहिती दिली आहे.

अखेर कोविडने गाठलेच.. लोक संकटात असतांना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील…

Gepostet von Arjun Khotkar am Sonntag, 13. September 2020

अखेर कोविडने गाठलेच..

लोक संकटात असतांना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील…शिवाय, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच रहा-सुरक्षित रहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित रहावे. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here