शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर अस्मिता जागी होत नाही…, संजय राऊतांचा भाजप,शिंदे गटाला सवाल!

sanjay-raut-criticize-rahul-narvekar-over-implementation-of-supreme-court-direction-news-update-today
sanjay-raut-criticize-rahul-narvekar-over-implementation-of-supreme-court-direction-news-update-today

नाशिक: गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्याव्यात. वादग्रस्त भाजपा प्रवक्त्यांना शिव्या देणाऱ्यांवर आम्ही फुलं उधळू. महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल. महाराष्ट्रात ढोंग्यांची लाट आली आहे. कुठलं यांचं शिवप्रेम. मोदींना रावण म्हटल्यावर त्यांची अस्मिता जागी होते, पण शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर अस्मिता जागी होत नाही. तेव्हा ते त्यांचा नाग फणा काढत नाहीत,” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंडखोरांवर सडकून टीका केली.

ते शनिवारी (३ डिसेंबर) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. शनिवारी (३ डिसेंबर) त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर प्रश्न विचारला. दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर  राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

संजय राऊत म्हणाले, “या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळं काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.”

 आणि अमानुषता आहे”

“मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

 “मोदींना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होते, पण…”

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना उत्तम शिव्या येत असतील, तर त्यांनी आधी या शिव्या राज्यपालांना, भाजपा मंत्री आणि प्रवक्ंत्याना देऊन दाखवाव्यात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here