Happy Birthday Salman Khan | अनेक महिने घरी बसावं लागलं, आता सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीचा स्टार

‘बिइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून सलमान गरजू लोकांना मदत करत असतो.

happy-birthday-salman-khan-after-a-superhit-movie-salman-khan-news-update
happy-birthday-salman-khan-after-a-superhit-movie-salman-khan-news-update

मुंबई : बॉलिवूडचा दबंग भाईजन सलमान खान (Happy Birthday Salman Khan) आज सोमवारी त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान त्याच्या अनोख्या डान्स मूव्ह, अॅक्शन आणि चित्रपटांमधील हटके अभिनयासाठी ओळखला जातो. सलमान खान त्याच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे.

प्रसिद्ध हिंदी चित्रपट लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक यांचा तो मोठा मुलगा आहे. सलमानबद्दल असे म्हटले जाते की, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचे नशीब इंडस्ट्रीत चमकते. त्याला अरबाज, सोहेल, अलविरा आणि अर्पिता अशी पाच भावंडे आहेत.

सलमानची दुसरी आई हेलन त्यांच्या काळातील लोकप्रिय कॅबरे डान्सर होत्या. शालेय शिक्षण संपल्यानंतर सलमान खानने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण मध्यातच कॉलेज सोडले. एकीकडे सलमान खान जिथे लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात असे अनेक वाद आहेत, जे अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात. ‘बिइंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून सलमान गरजू लोकांना मदत करत असतो.

एक सुपरहिट चित्रपट नंतर रिकामा!

सूरज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’ या रोमान्स चित्रपटाने बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नशीब चमकले. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. मात्र, या चित्रपटानंतर सलमान खानला सहा महिने रिकामे बसावे लागले होते.

नेमकं कारण काय?

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. चित्रपटसृष्टीत सलमान खानला सर्व काही सहज मिळाले असे नाही, त्याने खूप संघर्षही केला आहे. सलमान खानने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. जेव्हा मी लोकांकडे भूमिका विचारायला जायचो, तेव्हा कोणी म्हणायचे की मी हिरोसाठी लहान आहे, तर कोणी म्हणायचे की मी त्या वयापेक्षा मोठा आहे. याच कारणामुळे अनेक महिने घरी बसावं लागलं. मात्र, सलग सुपरहिट चित्रपटांनंतर आता सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीचा स्टार बनला आहे.

तेव्हा तो सनी देओल आणि संजूची मदत घ्यायचा

सलमान खानने स्वतः फिल्मफेअर दरम्यान एक किस्सा शेअर केला आणि सांगितले की, जेव्हा त्याचे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा तो सल्ला घेण्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे जात असे. एक किस्सा सांगताना सलमान खान म्हणाला की, जेव्हा तो अयशस्वी ठरला, तेव्हा सनी देओल त्याला सपोर्ट करायचा. तसेच करिअरच्या वाढीसाठी त्याने सनी देओल आणि संजय दत्तची मदत घेतल्याचे देखील सांगितले. सलमान खान म्हणाला की, 90 च्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा तो त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करत होता, तेव्हा संजय दत्त आणि सनी देओल इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव बनले होते.

सलमान खानने फिल्मफेअर इव्हेंटमध्ये सांगितले होते की, जेव्हाही त्याला असे वाटत होते की, चित्रपट चालत नाहीत, विस्कळीत होत आहेत, तेव्हा तो सनी देओल आणि संजूची मदत घ्यायचा. यामुळेच त्याने सनीसोबत ‘जीत’ आणि संजयसोबत ‘साजन’ या चित्रपटात काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here