छत्रपती संभाजी महाराज मराठा समाजाचे राजे नव्हे तर अठरापगड जातींचे राजे

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस,प्रवक्ते सचिन सावंत यांनी औरंगाबाद नामांतरप्रकरणी मांडली भूमिका

arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today
arvind-kejriwal-cm-Delhi-on-currency-note-goddess-photos-congress-leader-sachin-sawant-slams-bjp-aap-news-update-today

मुंबई: काँग्रेसने औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज chhatrapati-shivaji-maharaj हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते, ते अठरापगड जातींचे राजे होते. असं ट्विट काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस,प्रवक्ते सचिन सावंत Sachin sawant यांनी केलं आहे.

आपल्या मुलांचे नाव शहाजी आणि शरीफजी ठेवले होते

ट्विटद्वारे भूमिका मांडताना सावंत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते, केवळ हिंदूंचे नव्हते. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या मुलांचे नाव शहाजी आणि शरीफजी ठेवले होते ते तत्कालीन सुफी संत शाह शरीफजी यांच्यावरील श्रध्देपोटी. त्यांचे एक तृतीयांश सैन्य मुस्लिम होते.”

हेही वाचा : औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत?;शिवसेनेचा भाजपला सवाल

“तसेच ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते तर अठरापगड जातींचे राजे होते. ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांनी संभाजी महाराजांनाही विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी, आमच्या दैवतांनी स्थापन केले,” असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत?;शिवसेनेचा भाजपला सवाल

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरुन पुन्हा वाद

औरंगाबाद महापालिकेची आगामी काळात निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरुन भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला जात असतानाच भाजपाने मात्र शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

हेही वाचा : तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का? भाजपाचा शिवसेनेला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here