Maharashtra lockdown Extended l राज्यातील ‘लॉकडाऊन’ आणखी वाढणार?

ना. अस्लम शेख यांनी दिली माहिती

guardian-minister-aslam-shaikh-gives-reaction-on-lockdown-restrictions-in-maharashtra-news-update
guardian-minister-aslam-shaikh-gives-reaction-on-lockdown-restrictions-in-maharashtra-news-update

मुंबई l कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर आता उतरणीला लागला आहे. अनेक जिल्ह्यात आता करोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. तर, काही ठिकाणी मात्र परिस्थिती अजूनही आटोक्यात आली नाहीये. अकोला, अमरावती, नाशिक, सांगली, बुलडाणा यासारख्या काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील काही भागांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे. त्यामुळं राज्यातील लॉकडाऊन वाढणार की उठणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Maratha Reservation l CM उध्दव ठाकरे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्यपालांची घेणार भेट!

‘सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याबाबत आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी विचार करतोय. १५ मेनंतर लॉकडाऊन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो व कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो व कोणते निर्बंध कठोर करायचे याचा विचार करावा लागेल. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत विचार केला जाईल, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तसंच, लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्स काय शिफारस करत यावर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘लॉकडाऊनमुळं मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाऊनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाऊन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची आपली तयारी सुरु होती. जम्बो सुविधा उभारण्यासाठीकाम सुरु झाली,’ अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनची शक्यता वर्तवली होती. ‘अद्याप राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला नाही. राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर कमी होतोय. पण काही जिल्ह्यात हा दर स्थिर आहे. काही जिल्ह्यात करोनाचा वाढता दर दिसतोय तिथं कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचं याचा विचार १५ तारखेनंतरच करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here