Mumbai Indians vs Delhi Capitals l दिल्लीचा धुव्वा, मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक

ipl-2020-qualifier-1-mi-vs-dc-mumbai-indians-won-by-57-runs
ipl-2020-qualifier-1-mi-vs-dc-mumbai-indians-won-by-57-runs

IPL 2020 qualifier 1, MI vs DC  आयपीएल 2020 IPL 2020 मध्ये मुंबई इंडियन्स Mumbai Indians विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals यांच्यात पहिली क्वॉलिफायर IPL 2020 qualifier 1 मॅच झाली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 57 रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

मुंबई इंडियन्सने Mumbai Indians आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची चांगलीच दमछाक झाली.

मुंबई इंडियन्सच्या Mumbai Indians बॉलर्सने दिल्लीच्या बॅट्समनला एकामागेएक आऊट करत त्यांच्यावर दबाव बनवून ठेवला आणि ही मॅच अगदी सहज जिंकली. दिल्लीच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये आठ विकेट्स गमावत अवघ्या 143 रन्सपर्यंत मजल मारता आली. यामुळे मुंबईने ही मॅच 57 रन्सने जिंकली आहे.

दिल्लीचे चार बॅट्समन शून्यावर आऊट

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमची सुरुवातच खूप खराब झाली. पहिले तीन बॅट्समन खाते न उघडताच माघारी परतले. यामध्ये पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. तर डॅनिएल सॅम्स हा सुद्धा शून्यावर आऊट झाला.

हेही वाचा l New Hyundai i20 l नवी ह्युंदाई i20 लाँच

दिल्ली कॅपिटल्सकडून मार्कस स्टॉयनिस याने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, तो 65 रन्सवर आऊट झाला. तर अक्षर पटेल यानेही 42 रन्स केले. या दोघांव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून कोणत्याही बॅट्समनला चांगला स्कोअर करता आला नाही.  

मुंबईने दिले होते 201 रन्सचे आव्हान

मॅचच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत 200 रन्स केले आणि दिल्ली कॅपिट्स समोर विजयासाठी 201 रन्सचे आव्हान उभे केले.

हेही वाचा l poonam-pandey l पूनम पांडेला अश्लील फोटो,व्हिडिओ महागात पडलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई इंडियन्सच्या टीमकडून इशान किशन याने नॉट आऊट 55 रन्सची इनिंग खेळली. सूर्यकुमार यादव याने 51 रन्स केले. क्विंटन डी-कॉक याने 40 रन्स केले.  हार्दिक पांड्या यानेही 37 नॉट आऊट रन्सची इनिंग खेळली.

दिल्ली कॅपिटल्स कडून आर अश्विन याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने चार ओव्हर्समध्ये 29 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर एनरिच नॉर्टजे आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here