Sooryavanshi : अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमावर किसान मोर्चाकडून बहिष्कार

kisan-morcha-boycott-akshay-kumar-sooryavanshi-screening-in-panjab-news-update
kisan-morcha-boycott-akshay-kumar-sooryavanshi-screening-in-panjab-news-update

मुंबई: अक्षय कुमार आणि कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. ५ तारखेला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा रिलीज झालाय. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरी पंजाबमध्ये मात्र सिनेमाला मोठा विरोध होत आहे. पंजाबमध्ये काही ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेक-यांनी सिनेमाचे शो बंद पाडले.

पंजाबमध्ये किसान मोर्चाने चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये बदल करावे अशी मागणी करणाऱ्या किसान मोर्चाने अक्षय कुमार आणि मोदींमध्ये जवळीक असल्याने सिनेमाला विरोध दर्शवला आहे. या सिनेमावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा किसान मोर्चाचा विचार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारचा सत्तेत असलेल्या भाजप सरकारला पाठिंबा आहे. तसचं मोदींसोबतही त्याचे नजीकचे संबध आहेत त्यामुळेच त्याला विरोध पत्करावा लागतोय. वृत्तानुसार पंजाबमधील बुडलाधामधील दोन चित्रपटगृहांमध्ये शनिवारी ६ तारखेला दोन शो रद्द करण्यात आले. तसचं रोपडमध्येही ‘सूर्यवंशी’ चे शो बंद पाडण्यात आले.

पंजाबमधील किसान एकता मोर्चाने फेसबुक पेजवरून सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. याशिवाय पटियाला भागातील चित्रपटगृहांमध्ये देखील शो बंद करण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ सिनेमादेखील वादात सापडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here