दिल्लीनं जे हिसकावून घेतलं, ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्तींचा इशारा

मोदी सरकारकडून कलम ३७० पुन्हा मिळवण्यासाठी संघर्षाची हाक

pdp-chief-mehbooba-mufti appeal-to-people-of-jammu-and-kashmir-article-370-jammu-and-kashmir
pdp-chief-mehbooba-mufti appeal-to-people-of-jammu-and-kashmir-article-370-jammu-and-kashmir

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी PDPच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० परत मिळवण्याची काश्मिरी जनतेला हाक दिली आहे. मेहबुबा मुफ्ती यांना मंगळवारी सोडण्यात आलं. तब्बल १४ महिन्यांपासून त्यांना कैद करण्यात आलं होतं.

कैदेतून मुक्तता झाल्यानंतर ३७० कलमावरून मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. “दिल्लीनं जे हिसकावून घेतलं आहे, ते परत मिळवायचं आहे,” असा इशारा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.

महेबूबा मुफ्ती यांना 4 ऑगस्ट 2019 ला ताब्यात घेतले होते

महेबूबा  मुफ्ती यांना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द होण्याच्या एका दिवसापूर्वी 4 ऑगस्टच्या रात्री ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 6 फेब्रुवारीला महेबूबा मुफ्ती यांच्या अकटेचा कालावधी संपण्यापूर्वी पब्लिक सेक्युरिटी अॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती आणि त्यांच्या नजरकैदेचा कालावधी वाढवला होता.

वाचा l लेटरवॉर l ‘’राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं’’; पवारांची पंतप्रधानांकडे तक्रार

पब्लिक सेफ्टी अॅक्ट 1978 मध्ये लाकडाची तस्करी करण्याविरोधात बनला होता

पब्लिक सेफ्टी अॅक्ट 1978 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता. या अंतर्गत कोणत्याही सुनावणीशिवाय 2 वर्षापर्यंत केदेत ठेवता येते. सुरुवातीला हा कायदा लाकडाची तस्करी करणाऱ्याविरोधात होता. पण, हळु-हळू इतर गुन्ह्यातही या कायद्याचा वापर करण्यात आला.

फारूक आणि उमर अब्दुल्ला यांची सुटका झाली आहे

महेबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या एकमेव मोठ्या नेत्या होत्या, ज्यांना आतापर्यंत नजरकैदेत ठेवले होते. यापूर्वी माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली आहे. फारूक यांची 15 मार्च आणि उमर यांची 25 मार्चला सुटका करण्यात आली.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here