काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक

Ahmed Patel मेदांता हॉस्पिटलमध्येआयसीयूत दाखल

corona-virus-infected-congress-leader-ahmed-patel-admitted-to-icu
corona-virus-infected-congress-leader-ahmed-patel-admitted-to-icu

नवी दिल्ली l काँग्रेस Congress  पक्षाचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधींचे सल्लागार खासदार अहमद पटेल  Ahmed Patel यांची तब्येत खालावली आहे. त्यांना मेट्रो हॉस्पिटलमधून हरयाणातील Haryana गुरुग्रामच्या Gurugram मेदांता हॉस्पिटलमध्ये Medanta Hospital आयसीयूत Intensive Care Unit – ICU दाखल करण्यात आले आहे.

अहमद पटेल यांचा कोरोना corona रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. त्यांच्यावर दीड महिन्यापासून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. corona virus infected congress leader ahmed patel admitted to icu

अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी ट्वीट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्यावर अनुभवी डॉक्टर उपचार करत आहेत.

मात्र अहमद पटेल यांच्या तब्येतीत अद्याप अपेक्षित सुधारणा दिसलेली नाही. राजकीय वर्तुळातून तसेच काँग्रेसच्या नेत्यांकडून अहमद पटेल लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. 

अहमद पटेल यांच्या कुटुंबाच्यावतीने दिली ही माहिती

अहमद पटेल यांच्या कुटुंबाच्यावतीने फैझल पटेल यांनी आज रविवार, १५ नोव्हेंबर २०२० एक ट्वीट केले. या ट्वीटद्वारे त्यांनी अहमद पटेल यांना उपचारांसाठी गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती दिली.

अहमद पटेल यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन केले. फैझल पटेल यांच्या ट्वीटवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. अहमद पटेल यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे शशी थरुर यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here