काँग्रेस विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी देणार!

रमेश चेन्नीथला : औरंगाबाद जालना जिल्ह्याच्या विधानसभेचा आढावा

The government's conspiracy to postpone the assembly elections!
The government's conspiracy to postpone the assembly elections!

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, त्यामागे जनतेची भक्कम साथ आहे. २०१९ ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता पण २०२४ मध्ये १४ खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तयाराची आढावा बैठक व मराठवाड्यातील खासदार यांचा सत्कार सोहळा औरंगाबाद येथे संपन्न झाला, त्यावेळी चेन्नीथला बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष आमिर शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, छत्रपती संभाजी नगर काँग्रेसचे अध्यक्ष युसुफ शेख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, ए़़ड.मुजाहेद खान यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खा. डॉ.कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले.

महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार येणार हे काळ्या दगडावरी पांढरी रेष – नाना पटोले
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनगर, मराठा, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण १० वर्ष सत्ता असतानाही आरक्षण मात्र दिले नाही. भाजपा व फडणवीस यांनी जाती जातीमध्ये भांडणे लावली आहेत.  गोरगरिबांच्या तोंडाचा घास हिसकावणारे निर्ढावलेले महायुती सरकार जाऊन महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार येणार हे काळ्या दगडावरी पांढरी रेष आहे.

खोके देऊन आमदार फोडून बनवलेले हे खोके सरकार – बाळासाहेब थोरात
विधानसभा निवडणुकीलाही इतिहास घडवायचा आहे. खोके देऊन आमदार फोडून बनवलेले हे खोके सरकार भ्रष्टाचाराने माखलेले आहे. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून निवडणुका लढवायचे काम महायुती करत आहे.

राज्य गुजरातला गहाण टाकले – विजय वडेट्टीवार
महायुती सरकारने एक एक उद्योग गुजरातला पळवून नेले, महिंद्राचा २५ हजार कोटी रुपयांचा उद्योग येणार होता तोही गुजरातला घेऊन गेले. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या खूर्चीवर बसून राज्य गुजरातला गहाण टाकले आहे.

मविआचे सरकार आणायचे आहे – सतेज  पाटील  
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यशाचा पाया घातला आहे विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळवून त्यावर कळस चढवायचा आहे आणि मविआचे सरकार आणायचे आहे.

जनता भाजपाच्या या विखारी प्रचाराला बळी पडणार नाही – नसीम खान
भाजपा कधी हिंदू-मुस्लीम, स्मशान-कबरस्थान, पाकिस्तान करते आणि आता व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहादच्या फेक नॅरेटीववर मते मागत आहे पण जनता भाजपाच्या या विखारी प्रचाराला बळी पडणार नाही.

मराठवाड्याच्या  अनुशेष काँग्रेस पक्षच भरुन काढू शकतो – अमित देशमुख
मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो त्यामुळे मराठवाड्यातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here