Ola करणार Electric Scooters लाँच

एका वर्षात १० लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचे लक्ष्य

ola-electric-scooters-to-be-launched-in-india-in-january-2021-get-all-the-details
ola-electric-scooters-to-be-launched-in-india-in-january-2021-get-all-the-details

ओला Ola भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच Electric Scooters करणार आहे. कंपनी भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठीही प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच ओलाने भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा केली होती.

पुढील वर्षी जानेवारीमध्ये ओला भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे.

कमी किंमतीत जास्त मायलेज

कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. त्यात Etergo BV ने एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचं अतंर कापू शकणारी स्कूटर बनवली आहे. त्यामुळे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा l coronavirus updates l महाराष्ट्रात ४ हजार रुग्ण सापडले, ३० रुग्णांचा मृत्यू

भारतात सध्या २० मिलियन म्हणजेच २ कोटी स्कूटर आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला भविष्यातील गाडी मानलं जात आहे. भारतात पहिली स्कूटर लाँच केल्यानंतर एका वर्षात १० लाख इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्याचे कंपनीने लक्ष्य ठेवले आहे.

भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब

सध्या Etergo BV च्या प्रकल्पातच ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं प्रोडक्शन घेतलं जाईल. पण, कमी खर्च लागावा यासाठी पूर्णपणे भारतातच इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे.

हेही वाचा l कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर; ‘या’ चार राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयानं मागवला अहवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here