Toyota Glanza CNG लाँच होणार; मायलेजसह मिळणार दमदार फीचर्स

टोयोटा ग्लान्झा सीएनजी याच महिन्याच म्हणजेच नोव्हेंबरमध्ये भारतात सादर करणार आहे. टोयोटा ग्लान्झा, एस, जी आणि व्ही च्या जवळपास सर्व प्रकारांसाठी सीएनजी पर्याय आणणार आहे.

toyota-glanza-cng-will-be-launched-in-india-in-november-news-update-today
toyota-glanza-cng-will-be-launched-in-india-in-november-news-update-today

Toyota Glanza CNG टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी लवकरच ग्लान्झाचे सीएनजी मॉडेल भारतात लाँच करणार आहे. टोयोटा ग्लान्झा सीएनजी याच महिन्याच म्हणजेच नोव्हेंबरमध्ये भारतात सादर करणार आहे. टोयोटा ग्लान्झा, एस, जी आणि व्ही च्या जवळपास सर्व प्रकारांसाठी सीएनजी पर्याय आणणार आहे. सीएनजी व्हेरियंट फक्त बेस आणि टॉप मॉडेलसाठी लॉन्च केला जाईल. टोयोटा ग्लान्झा सीएनजीचे बुकिंग अनधिकृतपणे डीलरशिपवर सुरु झाले आहे आणि बरेच ग्राहक ते बुकिंग करत आहेत. सविस्तर जाणून घेऊया या कारबद्दल.

टोयोटा ग्लान्झा सीएनजी स्पेसिफिकेशन्स

टोयोटा ग्लान्झा सीएनजी कारमध्ये कंपनी १.२ लीटर के सिरीज डुअल जेट, डुअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन देईल. सीएनजीसह हे इँजिन ७६.४ बीएचपी पॉवर जनरेट करू शकतं. ही कार ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल. ही एक प्रीमियम हॅचबॅक कार असून सीएनजी मॉडेल लाँच झाल्यावर या कारच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टोयोटा ग्लान्झा सीएनजी लूक

टोयोटा ग्लान्झा एक स्पोर्टी लूकसह येते. यामध्ये टोयोटाचे सिग्नेचर क्रोम ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल, एलईडी फॉग लॅम्प, कार्बन फायबर टेक्चकरसह स्पोर्टी फ्रंट बंपर, स्लीक अलॉय व्हील, इंडिकेटरसह ऑटो ORVM इ. कारला UV प्रोटेक्ट ग्लास आणि LED टेल लॅम्प देखील मिळतात.

 टोयोटा ग्लान्झा सीएनजी मायलेज

हे लक्षात घ्या की टोयोटा ग्लान्झा सीएनजी चे मायलेज सुमारे २५ किमी असण्याची अपेक्षा आहे. तर पेट्रोलवर चालवल्यास AMT सह ही कार २२.९४ kmpl चे मायलेज देते. याचा अर्थ सीएनजी व्हेरियंटला पेट्रोलपेक्षा २ kmpl मायलेज अधिक मिळेल. त्यामुळे कार चालवण्याचा खर्च कमी होईल.

टोयोटा ग्लान्झा सीएनजी सुरक्षा फीचर्स

ग्लान्झा मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ३६०° सराउंड व्ह्यू कॅमेरा, ABS/EBD, ब्रेक असिस्ट, स्पीड ऑटोमॅटिक डोअर लॉक, हाय स्पीड अलर्ट सिस्टीम, रियर पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, ऑल पॉवर विंडो, व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल यासारख्या फीचर्संचा समावेश आहे. एवढंच नाही तर कार होल्ड कंट्रोल, फ्रंट, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज आणि इमोबिलायझरसह ही कार उपलब्ध असेल.

टोयोटा ग्लान्झा सीएनजीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात १.२-लीटर पेट्रोल इंजिन दिले जाईल आणि ते ७७ bhp पॉवर बनवेल, जे पेट्रोल मॉडेलपेक्षा १३ bhp कमी आहे. हे फक्त ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध केले जाईल. त्यांच्या व्हेरियंटमधील वैशिष्ट्यांच्या बाबतीत कोणतेही बदल केले जाणार नाहीत, जसे की पेट्रोल मॉडेलमध्ये आढळेल.

कारच्या केबिनबद्दल बोलायचे झाले तर ९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, हॅलो गुगल आणि हे सिरी व्हॉईस कमांड्स, हेड्स-अप डिस्प्ले आणि लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Glanza कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह येते. कारमधील कनेक्टिव्हिटीमध्ये रिमोट ऍक्सेस आणि कंट्रोल, फाइंड माय कार, जिओ फेन्सिंग, टो अलर्ट आणि ऑटो कोलिजन नोटिफिकेशन इत्यादींचा समावेश असू शकतो.

टोयोटा ग्लान्झा सीएनजी किंमत

टोयोटा ग्लान्झा सीएनजीची किंमत रु. ८.५ लाख ते रु. १०.५ लाख (एक्स-शोरूम) असण्याची अपेक्षा आहे आणि निवडक डीलरशिपवर आधीच अनधिकृत बुकिंग सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here