…आता परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस

direct-vaccination-to-students-going-abroad-for-education-news-update
direct-vaccination-to-students-going-abroad-for-education-news-update

मुंबई: मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी नवीन सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लस दिली जाणार आहे. पालिके च्या कस्तुरबा, राजावाडी, कूपर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी लस घेता येणार आहे. तसेच यापुढे ४५ वर्षांवरील नागरिकांनाही सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी नजीकच्या केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे. Direct-vaccination-to-students-going-abroad-for-education-news-update

पालिकेच्या आधीच्या नियमामुळे दरदिवशी जास्तीत जास्त सात हजार लाभार्थ्यांना लस देता येत होती. तर ४५ वर्षांवरील १९ लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे पालिके ने नियमावलीत बदल करीत ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोविशिल्डची पहिली व दुसरी मात्रा घ्यायची आहे अशा नागरिकांना सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी थेट लस घेता येईल. यात अपंगांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनाही कोविशिल्ड लसीचे दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी यांनाही याचा लाभ घेता येईल. स्तनदा माता यांनाही या लशीचा थेट लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० टक्के  लसीकरण हे कोविन एॅपवर नोंदणी करून लसीकरण केंद्र व वेळ निश्चित केल्यानंतरच के ले जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट के ले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here