सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी, बदनामी करणा-यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भाजपाला आवाहन

ed-anil-deshmukh-high-court-creating-undue-sensation-violating-norms-and-selectively-leaking-documents-news-update
ed-anil-deshmukh-high-court-creating-undue-sensation-violating-norms-and-selectively-leaking-documents-news-update

मुंबई : सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी. अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असं अनिल देशमुख पत्रकार परिषदेत बोलत होते.

सीबीआयचा अंतिम रिपोर्ट काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत

“एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.

“बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी केली. ते आता बिहारमधून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या प्रचाराला जाणार का?,” असा प्रश्न अनिल देशमुख यांनी यावेळी विचारला.

 

महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची मजल गेली

अनिल देशमुख यांनी यावेळी सुशांत मृत्यू प्रकरणावर अमेरिकेतील विद्यापीठाने तयार केलेला रिपोर्टचा दाखला दिला. “रिपोर्टमध्ये सुशांत प्रकरण एका राजकीय पक्षाने वेगळ्या दिशेने नेलं असून, प्रसारमाध्यमांकडून मोठं करण्यात आलं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. “एका पक्षाने सुपारी घेतली होती,” असा आरोप यावेळी त्यांनी नाव न घेता केला. “महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची मजल गेली होती,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हटलं होतं

“ज्यांनी पाच वर्ष मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हटलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र करोनाविरोधात युद्ध लढत असताना महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आलं. महाराष्ट्राला बदनाम करण्यात आलं. त्याच्याही पुढे जाऊन जे बाहेरचे आहेत पण महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत अशा बाहुलीलाही आपल्या तालावर नाचवण्याचं काम या पक्षाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यानिमित्ताने बदनाम झाला आहे,” अशी टीका अनिल देशमुखांनी केली.

वाचा : महाराष्ट्रात आता 15 वर्ष जुन्या रिक्षांना रस्यावर बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here