कोरोनाचा प्रकोप! एका दिवसात ४ लाख १२ हजार ६१८ रुग्ण सापडले, ३ हजार ९८० जणांचा मृत्यू

बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी कोरोनावर मात

india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update
india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. बुधवारी कोरोना रुग्णांच्या आकड्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार ६१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसऱ्यांदा देशात कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे. यापूर्वी ३० एप्रिलला देशात कोरोनाची बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

आतापर्यंत देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३ हजार १६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: जोधपुर जेल में आसाराम को हुआ कोरोना: ऑक्सीजन लेवल घटने पर अस्पताल में भर्ती 

देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.

देशातील १२ राज्यात १ लाखांहून अधिक, ७ राज्यात ५० हजाराहून अधिक आणि १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आहेत. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाचे प्रत्येक दिवशी २.४ टक्के वेगाने रुग्ण वाढत आहेत.

हेही वाचा: कोरोना रुग्णांचा हृदयविकाराच्या झटक्याने का होतोय मृत्यू?; वाचा लक्षणे आणि उपचार

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्याचबरोबर अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे लसीकरण वेगाने करणं गरजेचं आहे.

महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि केरळमध्ये रुग्ण वाढ
दररोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आता महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि केरळचा नंबर लागत आहे. कर्नाटकात बुधवारी 50 हजारांपेक्ष जास्त, तर केरळमध्ये 41,953 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here