Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात शनिवारी 42,462 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले, 23 मृत्यू

maharashtra-corona-update-42462-corona-positive-125-omicron-positive-patients-today-23-death-news-update
maharashtra-corona-update-42462-corona-positive-125-omicron-positive-patients-today-23-death-news-update

मुंबई: महाराष्ट्रात आज शनिवारी 42,462 नव्या कोरोना बाधित रुग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद करण्यात आली आहे. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आजची आकडेवारी ही एक हजारांनी कमी झाली आहे. काल राज्यात 43,211 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी मृत्यू संख्या वाढली आहे. राज्यात आज 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी 19 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

राज्यात आज 39,646 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 67 लाख 60 हजार 514 इतकी आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा 94.28टक्के इतका आहे. राज्यात सध्या 22 लाख 108 रुग्ण हे होम क्वारंटाइनमध्ये आहेत.तर 6 हजार 102 रुग्ण हे व्यक्तिगत क्वारंटाइन आहेत.

राज्यात आज ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात आज 125 नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. काल हीच संख्या दुप्पट होती. शुक्रवारी राज्यात 238 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली होती. राज्यात आज नोंद करण्यात आलेल्या ओमिक्रॉन बाधितांपैकी नागूपरमधील 39 रुग्ण आहेत. मुंबईत आज 24 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली.

तर मिरा भाईंदरमधील 20, अमरावतीत 9, अकोल्यात 5 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे पीसीएमसीला 3, औरंगाबाद,जालना,पुणे आणि अहमदनगर येथील प्रत्येकी 2 रुग्ण आहे आणि नाशिक, कोल्हापूर, लातूर,सातारा, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 1 ओमिक्रॉन रुग्ण आढळून आला आहे. मुंबईत आतापर्यंत 653 ओमिक्रॉबाधित रुग्ण आढळेत तर पुण्यात 537.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here