मुंबई l राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन कोरोनाबाधित (Maharashtra Covid update) आढळून आले असून, २ हजार ९७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०५,७८८ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.
आपल्या जबाबदार वर्तनाने तोडूया करोनाची साखळी#FitMaharashtra #MaharashtraFightsCorona #COVID19 #Unite2FightCorona #IndiaFightsCorona #MiJababdar@rajeshtope11 @yadravkar @CMOMaharashtra @MoHFW_INDIA pic.twitter.com/fXyg1fzky4
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) September 12, 2021
आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७७ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८१४२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५९,७९,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९७,८७७(११.६१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,२०७ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत, तर १ हजार ८९२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.
हेही वाचा