Mumbai Containment Zone पाहा Google Mapsवर l मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र

आता मुंबईतील कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्राची माहिती पाहा Google Mapsवर

mumbai-containment-zones-see-on-google-maps-bmc-covid19-updates
mumbai-containment-zones-see-on-google-maps-bmc-covid19-updates

Mumbai Containment Zones on Google Maps l मुंबईतील (Mumbai) कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची अद्ययावत माहिती (Containment Zones information) आता गुगल मॅपवर (Google Maps) पाहण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा उपलब्ध करुन देताना मुंबई महानगपालिकेला गुगलने सहकार्य केले (BMC initiative in partnership with Google) आहे.

मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना माहित असणे, महत्वाचे आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी मनपाच्या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करण्यात येते.

या वेबसाईटवर मुंबईतील २ विभागनिहाय नकाशांत प्रतिबंधात्मक क्षेत्र सुद्धा दर्शवण्यात येतात. मात्र नागरिकांना एका क्लिकवर सहजसोप्या माहिती व्हावी या उद्देशाने मुंबई मनपाने गुगल मॅपची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

Google Mapsवर असे पाहा मुंबईत प्रतिबंधात्मक क्षेत्र 

  1. मुंबई महानगरपालिकेच्या विभागांकडून पुरवल्या जाणाऱ्या माहितीनुसार हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहता येतील.
  2. नागरिकांनी मोबाइलवर गुगल मॅप हे अॅप सुरू केल्यावर ‘कोविड १९ इन्फो’ हा पर्याय निवडावा.
  3. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा नकाशा झूम करुन पाहताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात आणि कोविड १९ कंटेन्मेंट धोन या उपशीर्षकासह दिसू लागतात.
  4. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते.  आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे हे नागरिकांना समजणे सोपे होईल.

महानगरपालिकेने कोरोनाविषयक माहिती प्रसारित करण्याकरिता https://t.co/fd8bmBQK6d पलीकडे जाऊन @Googleशी समन्वय साधला आहे
@googlemaps वर प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती (विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहिती आधारे)

गूगल सर्चवर अद्ययावत माहिती

याचा प्रारंभिक टप्पा दर्शविणारा व्हिडिओ pic.twitter.com/0Tjrtdolgc

मुंबई महानगरपालिका आणि गुगल यांनी एकत्र ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये वेळोवळी अद्ययावत बदल केले जाणार आहेत. भूगोल जीआयएस आणि जेनेसीस यांचाही मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमात हातभार लागला आहे.

गुगल मॅपवर ‘कोविड१९ इन्फो’ हा पर्याय निवडल्यानंतर मुंबई महानगरपालिका या पर्यायावर क्लिक केले तर थेट महानगरपालिकेच्या वेबसाईटवर stopcoronavirus.mcgm.gov.in या पृष्ठावर कोरोना विषयक संपूर्ण माहिती देखील पाहता येते.

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पारदर्शकपणे माहिती पुरवण्यातही मुंबई महानगरपालिका तत्पर झाली आहे. महानगरपालिकेची रुग्णालये, कोविड सेंटर्स, इतर कामे या सर्वांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शक्य तिथे करण्यात येत आहे.

वाचा : मुथय्या मुरलीधरनवर बायोपिक येतोय, विजय सेतपुती साकारणार भूमिका

अचूक, पारदर्शकता राखून वेगवान कार्यवाही करण्यासाठी मदत होत आहे. या संदर्भातील माहिती महानागरपालिकेच्या वेबसाईटवर, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात येते. यामुळे कोरोना संसर्गाची नेमकी स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे दिसत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here