राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘एलजीबीटी’ सेलची केली स्थापना

जयंत पाटील यांनी केली कार्यकारिणीची घोषणा, प्रिया पाटील राज्यप्रमुख

nationalist-congress-party-announced-lgbt-cell-body-jayant-patil-priya-patil
nationalist-congress-party-announced-lgbt-cell-body-jayant-patil-priya-patil

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं आज देशातील पहिल्या ‘एलजीबीटी सेल’ स्थापन केली. पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एलजीबीटी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा केली. या सेलच्या राज्य अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

“राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता ‘एलजीबीटी सेल’ स्थापन करुन या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,” असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. “समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे, शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे.

एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून, प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे,” असं जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

एलजीबीटीसेलची स्थापना करणारा देशातील पहिला पक्ष

“राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याने युवती संघटना स्थापन केली आणि आता ‘एलजीबीटी’ सेलची स्थापना करत आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही, तर कृती करणारा पक्ष आहे. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे,” असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रिया पाटील यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले. प्रिया पाटील यांनी एलजीबीटी सेलच्या स्थापनेमागील भूमिका विशद केली.

‘एलजीबीटी सेल’ च्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती केली

सेलची इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी – माधुरी सरोदे – शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी – उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष – सावियो मास्करीनास, सदस्य – अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन यांचा समावेश आहेत.

वाचा : संजय राऊत सुशांत प्रकरणावर कुणाला म्हणाले हरामखोर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here