रणबीर कपूर अाणि आलिया भट्ट आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चे कलाकार आहे. या चित्रपटाच्या डबिंगचे काम त्यांनी सुरू केले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून यावर काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत.
चित्रपटाच्या टीजर आधी कलाकारांचा एक व्हिडिओ रिलीज होणार आहे. यात दोघे कलाकार ‘ब्रह्मास्त्र’विषयी माहिती देणार आहेत. आलिया आणि रणबीर यात ईशा आणि शिवाचे पात्र साकारत आहेत. या स्पेशल व्हिडिओ सिरीजचे शूटिंग 10 ते 12 दिवस चालेल. चित्रपटासाठी एक डान्स सिक्वेंसदेखील शूट व्हायचे आहे.
अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका
या चित्रपटात रणबीर आणि आलिया यांच्यासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही महत्त्वाची भूमिका आहे. बिग बी चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलमध्ये चित्रीकरणात सहभागी होणार आहेत. ते रणबीर सोबतच्या महत्त्वाच्या दृश्यांचे शूटिंग करतील.
कोरानामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडणार
हा चित्रपट 4 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी बघता रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.











































































































































