भाजप खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख

saayoni-ghosh-original-sex-worker-rall- west-bengal -bjp-mp-saumitra-khan-called-actress-
saayoni-ghosh-original-sex-worker-rall- west-bengal -bjp-mp-saumitra-khan-called-actress-

पश्चिम बंगाल: ‘अभिनेत्री सायानी घोष Saayoni-ghosh एक सेक्स वर्कर Sex-worker आहे’, असं म्हणत भाजपा खासदार Bjp MP सौमित्र खान Saumitra-khan यांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री सायानी घोष हिने ट्विटरवर एक मीम शेअर केलं होतं. या मीम्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. यामध्येच आता भाजपा खासदार सैमित्र खान यांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

“चित्रपट अभिनेत्री सायानी घोषने केलेल्या ट्विटमध्ये सरस्वती देवीची अवहेलना केली आहे. हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत. पण मी सांगतो की, सायानी घोषच खरी सेक्स वर्कर आहे आणि जर या वक्तव्यानंतर तुम्हाला माझ्या विरोधात तक्रार करायची असेल तर करु शकता. आता खरं तर ममता बॅनर्जी यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. नाही तर, एक मंदिर सुद्धा अस्तित्वात राहायचं नाही”, असं सौमित्र खान म्हणाले आहेत.

हेही वाचा: दिल्लीमध्ये हडकंप माजवणारा दीप सिद्धू मोदी-शहांच्या गोटातला: शिवसेना

हे आहे प्रकरण?

अभिनेत्री सायानी घोष हिने ट्विटवर एक मीम शेअर केलं होतं. या मीम्समुळे हिंदुंच्या भावना दुखावल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हादेखील दाखल झाला आहे. यात मेघालयचे माजी राज्यपाल आणि भाजपा नेते तथागत रॉय यांनीदेखील गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख;गृहमंत्र्यांच्या इशा-यानंतर बदल

मात्र, सायानीने तिच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. हे ट्विट २०१५ चं असून त्यावेळी माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. त्यामुळे हे ट्विट मी केलेलं नाही, असं स्पष्टीकरण सायानीने दिलं आहे.

हेही वाचा: Farmer’s protest : किसान आंदोलन था, है और रहेगा, 30 जनवरी को रखेंगे उपवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here