
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच प्रदेश कार्यकारीणी बैठकीत मोठं वक्तव्य केलं आहे. ”केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री (Chief Minister) झाले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले.
आपल्याला दुःख झालं, पण आपण ते दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर भाषणात आपली खदखद् व्यक्त केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुढे ते म्हणाले, की सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. पुढे ते म्हणाले, की जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत. त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत. असं ही चंद्रकांत पाटील म्हणाले.