इंस्टाग्रामचे १० नवीन फिचर्स; मॅसेंजरवरुन इंस्टा यूजर्सलाही करता येणार मेसेज

instagram-10-new-features-cross-platform-message-support
instagram-10-new-features-cross-platform-message-support

इंस्टाग्रामचे १० नवीन फिचर्स मॅसेंजरवरुन इंस्टा यूजर्सलाही करता येणार आहे. मेसेजफेसबुक कंपनी इन्स्टाग्राम आणि मेसेंजर यांच्यात क्रॉस प्लैटफॉर्म मॅसेजिंगसाठी प्रयत्न करत आहे. फेसबुकने नुकताच याबाबत खुलासा केला आहे. यामध्ये फेसबुकला यशही मिळाले आहे. फेसबुकने नुकतेच क्रॉस अॅप मॅसेजिंग आणि कॉलिंग फीचर लाँच केलं आहे.

आता मॅसेंजरहून इंस्टा यूजर्सला किंवा इंस्ट्रावरुन मेसेंजरवरील युजर्सला मेसेज करणं किंवा फोन करणं शक्य झालं आहे. यासारखी १० नवीन फिचर्स इंस्टाग्रामवर आली आहेत.

पाहा ही आहेत ती फिचर्स

क्रॉस प्लॅटफ़ॉर्म मॅसेज – या फिचर्सनुसार आता मॅसेंजरहून इंस्टा यूजर्सला मेसेज पाठवू शकतो किंवा फोनही करु शकतो. दोन्हीकडे तेच कॉन्टॅक्ट असेल तरच हे फिचर वापरता येतं.

वॉच टुगेदर फ़ीचर – या फिचरनुसार Facebook वर एकत्र व्हिडीओ पाहू शकतो. हे व्हिडीओ Facebook वॉच, IGTV, Reels चे असतील.

वॅनिश मोड – या फिचरमुळे तुम्ही पाठवलेले मेसेज समोरील व्यक्तीने वाचल्यानंतर चॅट विंडोतून बाहेर आल्यावर मेसेज डिलिट होणार.

सेल्फ़ी स्टिकर्स – सेल्फी क्लिक केल्यानंतर याला बूमरँग स्टिकर्स करु शकतो.

वाचा : Amazfit Neo स्मार्टवॉच भारतात लाँच 

कस्टम इमोजी रिएक्शन्स – यामध्ये फेवरेट ईमोजीचा शॉर्टकट तयार करु शकतो.

मेज कंट्रोल्स – या फिचर्सचा वापर करुन आपल्याला कोण मेसज करु शकतो हे ठरवू शकतो. अनावश्यक मेसेज टाळण्यासाठी याचा वापर करता येणार .

इनहँसमेंट रिपोर्टिंग आणि ब्लॉकिंग अप्डेट्स – आता संपूर्ण संभाषणालाही रिपोर्ट करु शकतो. पहिल्यांदा फक्त एखाद्या मेसेजला रिपोर्ट करता येत होतं.

चॅट कलर्स  फॉर्वर्डिंग, रिप्लाईज, एनिमिटेड मेसेज इफेक्ट्स 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here