औरंगाबाद : बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Bilkis Bano case) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची गुजरात सरकारने सुटका केली. मुदतपूर्व सुटकेच्या विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने शनिवारी औरंगाबादेत क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आले. या वेळी गुजरात सरकार व भाजप विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोदी हटाव, बेटी बचाव, महिलांओ के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे, बिलकीस बानो ला न्याय मिळालाच पाहिजे, आदी घोषणा देण्यात आल्या. विभागीय आयुक्तांमार्फेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निवेदन पाठविण्यात आले.
आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके, राष्ट्रीय सचिव विणा खरे, मराठवाडा अध्यक्षा शाजिया शेख, सोनाली देशमुख, डॉ सुनीता सावंत, सविता गायकवाड, वैशाली चौधरी, धनश्री कांबळे, मंजुषा पवार, उमा नेव्हल, शकीला खान, स्मिता तुपे, शबाना शेख, शमा परवेज, सुरेखा जगताप, युवती अध्यक्षा अंकिता विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. मयुर सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम अहमद, महेश उबाळे, कविता होळकर, मुन्ना खान, अय्युब खान आदी उपस्थित होते.
मुंबई दादर येथे बिल्किस बानोच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यांवर फलक घेऊन उभे होते.
जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी गुजरात सरकारने बिल्किस बानोच्या खटल्यातील दोषींना सुनावलेली शिक्षा माफ केल्याच्या विरोधात नवी दिल्लीत निदर्शने केली. (पीटीआय)
गुजरात सरकारने बिल्किस बानोच्या खटल्यातील दोषींना सुनावलेली शिक्षा माफ केल्याच्या विरोधात कार्यकर्ते आणि विविध महिला संघटनांच्या सदस्यांनी बंगळुरू येथील स्वातंत्र्य उद्यानात आंदोलन केले. (पीटीआय)