BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 30 पदांची भरती, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

21 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु राहणार

bel-recruitment-2021-for-30-trainee-engineer-vacancies-in-military-communication-sbu-bengaluru-complex-apply-online-news-update
bel-recruitment-2021-for-30-trainee-engineer-vacancies-in-military-communication-sbu-bengaluru-complex-apply-online-news-update

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) नवरत्न कंपनीने बंगळुरू कॉम्प्लेक्समधील मिलिट्री कम्युनिकेशन एसबीयू अभियंता पदासाठी जाहिरात काढलीय. कंपनीने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, प्रशिक्षणार्थी अभियंता -1 च्या एकूण 30 पदांवर कंत्राटी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेत. इच्छुक उमेदवार बीईएल, bel-india.in च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. 12 मे रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 21 मेपर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. Bel Recruitment 2021 for 30 trainee engineer vacancies in military communication sbu bengaluru complex apply online

पात्रता

बीईएल प्रशिक्षणार्थी अभियंता भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इतर संबंधित व्यवहारांमध्ये चार वर्षांची पूर्ण-वेळ बीई/बीटेक पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवारच पात्र आहेत. याव्यतिरिक्त 1 एप्रिल 2021 रोजी उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि इतर राखीव वर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आलीय. अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा.

हेही पाहा: BNP Recruitment 2021 l सरकारी नोकर्‍या, नोटा छापण्यासाठी बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

अशी होईल निवड?

बीईएल प्रशिक्षणार्थी अभियंता भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड बीई/बीटेक गुण, संबंधित कामाचा अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. बीई/बीटेक गुणांसाठी 75%, अनुभवासाठी 10% आणि मुलाखतीसाठी 15% वेटेज निश्चित केले गेलेय.

असा करावा अर्ज?

अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर करिअर विभागात जा आणि नंतर मिलिटरी कम्युनिकेशन एसबीयू बंगलोर कॉम्प्लेक्स ट्रेनी इंजिनीअर रिक्रूटमेंट विभागात दिलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा आणि अर्ज पानावर जा, जिथे उमेदवारांना प्रथम साईनअप करावे लागेल आणि त्यानंतर आपला नोंदणी फॉर्म भरा आणि आपली कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सॉफ्ट कॉपी स्वतःकडे ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here