नवी दिल्ली l एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ Blue Moon असे म्हटलं जातं. आज शनिवार (३१ ऑक्टोबर) रोजी रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ पाहण्याचा योग आला आहे.
पुढील ब्लू मून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी दिसेल. २ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३५ वाजता महिन्यातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन झाले होते. त्यानंतर आता महिनाखेरला ३१ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा पूर्ण चंद्र दर्शन होणार आहे.
उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तीत प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करडय़ा छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो. मात्र ‘ब्लू मून’च्या Blue Moon व्याख्येचा त्याच्या रंगाशी काहीही संबंध नाही.
दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’Blue Moon असे म्हटले जाते
दुर्मीळ प्रसंगाला इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे म्हटले जाते. १७ व्या शतकात याचा वापर करण्यात आला होता. दरवर्षी प्रत्येक महिन्याला एक असे वर्षाला १२ पुर्ण चंद्र दिसतात. मात्र, ब्लू मूनमुळे यंदा १३ पूर्ण चंद्र दिसणार आहे.
यापूर्वी अशी घटना ३० जून २००७ रोजी घडली होती. त्यानंतर असा प्रसंग ३० सप्टेंबर २०५० रोजी येईल. २०१८ साली ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्लू मून’ दिसले होते. पुढील ‘ब्लू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसेल.
पाश्चात्य देशांत ग्रीष्म, उन्हाळा, शरद, हिवाळा असे प्रत्येकी ३ महिन्यांचे चार ऋतू असतात. दर महिन्याला एक याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये तीन पूर्ण चंद्र दिसणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक पूर्ण चंद्र वेगळ्या नावाने ओळखला जातो. प्रत्येक चंद्रमास २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे, ३८ सेकं दे इतक्या कालावधीचा असतो.
हेही वाचा l Sponge gourd benefits l घोसाळी खाण्याचे गुणकारी फायदे
प्रत्येक सौरवर्ष ३६५ दिवस, ५ तास, १९ मिनिटे, ३० सेकं दे इतक्या कालावधीचे असते. यानुसार प्रत्येक सौरवर्षांत पूर्ण १२ चंद्र वर्षे असतात.
शिवाय १० दिवस आणि २०.९ तास अधिकचे असतात. अधिकचा कालावधी साचत जातो आणि दर ३० महिन्यांनी एकदा अधिकचा पूर्ण चंद्र दिसतो.
तिसऱ्या पूर्ण चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते
‘ब्लू मून’ ज्या ऋतूत दिसतो त्या ऋतूमध्ये त्या वर्षी तीनऐवजी चार पूर्ण चंद्र दिसतात. अशावेळी तिसऱ्या पूर्ण चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते.
फेब्रुवारी कमी कालावधीचा असल्याने ‘ब्लू मून’ कधीच दिसू शकत नाही. ३० दिवसांच्या महिन्यात ‘ब्लू मून’चे प्रमाण फार अत्यल्प असते.
[…] Blue Moon l ‘ब्लू मून’ चा आज योग,पाहा रात्री ८… […]