पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah आणि मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव Harshvardhan Jadhav यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेनं हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात ही तक्रार दिली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह, तसंच खालच्या पातळीवर बोलताना दिसले.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी सोशल माध्यमांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी केलीय. याशिवाय, गृहमंत्री अमित शहांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर भाषा वापरत लैंगिक स्वरूपाची टिप्पणी केली. याच पार्श्वभूमीवर जाधव यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम ३५४ (अ), ५०९, ५०१, ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.