गाजियाबाद : उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी एक ‘मॉडिफाय’ केलेली डान्सिंग स्कॉर्पिओ dancing-scorpio-car कार ताब्यात घेतली आहे. यासोबतच कारच्या मालकाला 41 हजार 500 रुपये दंडही आकारण्यात आला. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा Dipanshu kabra यांनी डान्सिंग कारचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रविवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडे काही उपद्रवी तरुण रस्त्यावर कर्कश्य आवाजात गाणी वाजवत असून स्टंट देखील करत असल्याची तक्रार आली होती. नसूम अहमद Nasum Ahmed असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे.
हेही वाचा : इनकम टैक्स रिटर्न की आखिरी तारीख अब 10 जनवरी 2021 हुई
त्याने आपली स्कॉर्पिओ कस्टमाइज केली होती. आतून-बाहेरुन त्याने गाडी सजवली होती, तसेच मोठमोठे स्पीकरही लावले होते. चालकाने ब्रेक मारल्यानंतर ही कार जोरजोरात हलायची, त्यामुळे बघणाऱ्याला ती डान्सिंग कारप्रमाणे वाटायची.
गाज़ियाबाद में इस #DancingCar पर 41,500रु का चालान काटकर पुलिस द्वारा सीज किया गया. गाड़ी पर जातिसूचक शब्द लिखा था.
सड़क पर अभद्रता का प्रदर्शन शर्मनाक है.
गाड़ी कस्टमाइज़ करना अच्छी बात है लेकिन ट्रैफिक नियमों के विरुद्ध जाकर, दूसरे राहगीरों को दुख-असुरक्षाबोध कराना गलत है. pic.twitter.com/cfUsaMkVM8— Dipanshu Kabra (@ipskabra) December 30, 2020
हेही पाहा : Photo : गौहर खान आणि जैद दरबारचं खास फोटोशूट
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून भविष्यात कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट मॉडिफाय केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा : सोन्याचा बर्गर खाण्यासाठी लोक लावत आहेत रांगा
हेही वाचा : किसान आंदोलन का 36वां दिन, अमृतसर से बाइकों पर सिंघु बॉर्डर आ रहे युवा