Eating Sesame Seeds Benefits l तिळाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

eating-sesame-seeds-is-extremely-beneficial-for-health-tips-update-freepressindia.in
eating-sesame-seeds-is-extremely-beneficial-for-health-tips-update-freepressindia.in

तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिखट चटणीपासून गोड पदार्थ बनविण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. तिळाचा वापर आरोग्यासाठी होतोच सोबतच तिळाचे अनेक फायदे आहेत.

अगदी तिळाचा त्वेचासाठी सुद्धा फायदा आहे. हिवाळ्यात त्वेचा कोरडी होते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी फायदा होतो. तिळाचा तेलाचा हिवाळ्यात जबरदस्त फायदा होतो. त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी तिळाच्या तेलाचा खूप फायदा होतो.

तिळाच्या तेलाचा मसाज करा

आठवड्यातून 2 वेळा तरी आंघोळीला जाण्यापूर्वी तिळाच्या तेलाचा मसाज करा. तिळाचं तेल गरम असल्याने त्याने शरीराला मसाज केल्यास रक्तप्रवाह चांगला होतो. तसंच त्वचा मऊ आणि मुलायम होते. तिळाच्या तेलाने मसाज केल्यावर साधारण एक तासाने गरम पाण्याने आंघोळ करा.

तिळाच्या तेलाने मसाज केल्यास केसाची पोत सुधारते

त्वचेसाठी जसं तिळाचं तेल फायदेशीर आहे तसंच केसासाठी तिळाचं तेल उत्तम आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे केसात कोंडा होतो आणि केस कोरडे राठ वाटतात. अशावेळी हिवाळ्यात केसांना तिळाच्या तेलाने मसाज केल्यास केसाची पोत सुधारते.

केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. खोबरेल तेलात तिळाचं तेल मिक्स करा आणि या मिक्स केलेल्या तेलाने केसांमध्ये मसाज करा. साधारण तासाभरानंतर गरम पाण्याने केस धुवून टाका.

तिळाचा स्क्रब म्हणून खूप चांगला फायदा

हो, बरोबर तिळाचा स्क्रब म्हणून खूप चांगला फायदा होतो. तीळ रात्री दुधामध्ये भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमधून याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये हळद आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हा स्क्रब चेहरा आणि अंगाला लावा. या पेस्टने मसाज करा. या स्क्रबमुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होतो, त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार दिसते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here