मुंबई: अभिनेत्री गौहर खानला Gauhar khan कोरोनाची लागण Covid tested positive झाली आहे आणि तिला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, गौहर खान शूटिंगसाठी गेली असल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या तक्रारीनंतर मध्ये भारतीय दंडसंहितेच्या साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कलम १८८, २६९, २७०, ५१ब अन्वये तिच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं.
ओशिवरा पोलिसांच्या माहितीनुसार, गौहरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अंधेरीतल्या तिच्या घरी जेव्हा ते गेले त्यावेळी तिथे कोणी दार उघडलं नाही. गौहर बाहेर शूटिंगसाठी गेली आहे. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
नियम सर्वांसाठी सारखेच!
कोरोनाविषाणू संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईकरांनो, कृपया सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा.#NaToCorona pic.twitter.com/EtEgKHfwRW
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 15, 2021
यावर महापालिकेकडून ट्विटही करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “शहराच्या सुरक्षेसंदर्भात कसलीही तडजोड केली जाणार नाही. कोरोना बाधित असतानाही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. आमची नागरिकांना विनंती आहे की या नियमांचं पालन करा आणि शहराला कोरोनाला हरवण्यासाठी मदत करा.”