औरंगाबादेत कर्ज फेडण्यासाठी तरुणाने चक्क एटीएम फोडले; मॅनेजरने त्याला कोंडून पकडले!

जटवाडा रोड सारा वैभव समोरील घटना

In Aurangabad, a young man broke an ATM to pay off a loan; The manager locked him up!
In Aurangabad, a young man broke an ATM to pay off a loan; The manager locked him up!

औरंगाबाद:अंगावर दहा ते बारा लाख रुपयाचे कर्ज होते. कर्जासाठी बँकाकडून वसुलीसाठी फोन येत असल्यामुळे आरोपीने चक्क जटवाडा रोडवर सारा वैभव समोरील एसबीआय बँकेचा एटीएम फोडणाच्या प्रयत्न केला. लाईव्ह मॉनेटरींगमुळे चोरीचा प्रयत्न फसला. आरोपीला एपीए कंपनीचे मॅनेजर, इलेक्ट्रीशीयनने रंगेहाथ पकडून एटीएममध्येच कोंडले. एटीएममध्ये अंदाजे १५ लाख रुपये होते अशी माहिती समोर आली. आरोपीला बेगमपुरा, हर्सूल पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.१५ उघडकीस आली.

इद्रीस युसुफ पठाण (३४ ) रा. रसुलपुरा जटवाडा गाव औरंगाबाद, असे एटीएम फोडणा-या आरोपीचे नाव आहे. आरोपी इद्रीसवर दहा ते बारा लाख रुपये कर्ज होते. कर्जासाठी त्याला विविध बँकाकडून वसुलीसाठी फोन येत होते. कर्ज फेडण्यासाठी त्याच्या मनात चक्क एटीएम फोडण्याचा विचार आला. आरोपी इद्रीसने लोखंडी सब्बल, विळा, दोरी, हातोडा घेऊन जटवाडा रोडवरील एटीएम फोडले. परंतु त्याबाबतचे सर्व चित्रीकरण हे मुंबईच्या लाइव्ह मॉनेटरींग रुममध्ये रेकॉर्ड झाले. याची तात्काळ माहिती मुंबईच्या स्थानिक कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडचे एटीएम चॅनल मॅनेजर अभिजीत सतीष निकुंभ यांना देण्यात आली.

त्यानंतर निकुंभ यांनी याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्याला दिली. सोबत इलेक्ट्रीशीयन एकनाथ तेले यांना घेऊन जटवाडा रोडवर निकुंभ  गेले. त्यावेळी आरोपी अर्धा शटर खाली करुन एटीएम फोडताना दिसून आला. आरोपी हल्ला करेल किंवा पळून जाईल या भीतीने शटर खाली पाडून त्याला कोंडून टाकले. त्यानंतर पाच मिनिटांनी बेगमुपरा, हर्सूल पोलीस घटनास्थळावर पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतले. एटीएममधील पाहणी केली त्यावेळी रक्कम ही पूर्णपणे सुरक्षीत होती. असे मॅनेजर निकुंभ यांनी सांगितले. आरोपीविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस जमादार कचरे तपास करत आहे.
मुंबईच्या कंट्रोलरुममधून आला फोन…
मुंबई येथे सर्व एटीएमचे लाईव्ह मॉनेटरींग केले जाते. त्यावेळी जटवाडा रोडवरील घटनेची सर्व माहिती मुंबईच्या कंट्रोलरुमला मिळाली. ही घटना घडताच मुंबईच्या कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे चॅनल मँनेजर अभिजीत सतीष निकुंभ यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ त्याची माहिती बेगमपुरा पोलीस स्टेशनला कळवली. व घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आरोपी एटीएम फोडत असतांना शटर अर्धवट खाली होते. त्याचवेळी निकुंभ यांनी शटर खाली पाडले आणि बाहेरुन लॉक लावले. पाच मिनिटानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चोरट्याला रंगेहाथ पकडले.
एटीएमचे शटर बंद करुन आरोपीला कोंडले..
मुंबई येथील कार्यालयात एटीएम फोडतानाचे चित्रिकरण रेकॉर्ड झाले. त्याची माहिती मुंबईहून स्थानिक मॅनेजरला मिळाल्यानंतर त्यांनी एक कर्मचा-याला सोबत घेऊन जटवाडा येथे पोहोचले. व शटर अर्धे खाली करुन आरोपी एटीएम फोडत असताना त्याला शटर खाली करुन कोंडले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here