Lockdown मध्ये फी वाढवली; मुंबई, नवी मुंबईतील 8 शाळांची मान्यता रद्द

proposal-of-mumbai-navi-mumbai-panvel-8-school-noc-over-fees-increased-in-lockdown-news-update
proposal-of-mumbai-navi-mumbai-panvel-8-school-noc-over-fees-increased-in-lockdown-news-update

नवी मुंबई :कोरोनाच्या या संकट काळातही Corona Pandemic अनेक खासगी शाळांची मनमानी समोर आली होती. अनेक शाळांनी या संकट काळात फी वाढ Fees hike from many schools केल्याचंही समोर आलं होतं. फी वाढ करणे, फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणे, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना निकालपत्र न देणे असे कृत्य करुन विद्यार्थी आणि पालकांना त्रास देणाऱ्या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द Proposal of Cancellation NOC करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

नवी मुंबई विभागातील एकूण पाच शाळा, मुंबईतील दोन आणि पनवेलमधील एका शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देवून शाळा बालकांचा मोफत आणि सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009च्या कलम 16 आणि 17चे उल्लंघन करत आहे. त्यामुळे अशा शाळांवर शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने नवी मुंबई मनपा आयुक्तांनी या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रायगड जिल्हा परिषध यांच्याकडून शिफारसींसह प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना पाठवला आहे.

या शाळांवर कारवाई

अमृती विद्यालय, (नेरूळ), न्यू होरायझन पब्लिक स्कूल (ऐरोली), रायन इंटरनॅशनल स्कूल (सानपाडा), सेंट लॉरेन्स स्कूल (वाशी), तेरणा आर्चिड इंटरनॅशनल स्कूल (कोपरखैरणे), विश्वाज्योत हायस्कूल (खारघर), बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल (मालाड आणि सांताक्रुझ)

मुंबई विभागीय उपसंचालकांकडून पुणे शिक्षण संचालकांना प्रस्ताव सादर

>>लॉकडाऊन काळात फी वाढ करणे

>>पालकांना फी भरण्यास तगादा लावणे

>>फी न भरल्याने निकालपत्र न दाखवणे

>>विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे

फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण न दिल्याने या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी नवी मुंबई, मुंबई आणि पनवेल महापालिकेने मुंबई उपसंचालकांकडे केली होती. या मागणी नुसार मुंबई विभागीय उपसंचालकांनी पुणे शिक्षण संचालकांना प्रस्ताव सादर केला आहे.

हेही वाचा

प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज?; भाजपाने दिलं हेस्पष्टीकरण

केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज; नाना पटोलेंचा टोला

एकनाथ खडसे म्हणाले, अभी कुछ होनेवाला है, असा मेसेज फिरत होता…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

Petrol Diesel Price Today l इंधनाचा भडका! 109 रुपये लीटरवर पोहोचले पेट्रोलचे दर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here