मुंबई : अभिनेत्री कंगना रणैतनचे महाविकास आघाडी सरकारशी पंगा घेऊन स्वत:च्या अडचणीत वाढ करुन घेतली आहे. ड्रग्ज प्रकरणी कंगनाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. कंगना रणौतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता राज्य सरकार चौकशी करणार आहे असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
अभिनेत्री कंगना रणैतने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर कलाक्षेत्रातून आणि राजकीय क्षेत्रातून टीकेची झोड होती. एवढंच नाही तर संजय राऊत आणि कंगना यांच्यात आरोपांच्या फैरीही झडल्या. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्तावही आणला गेला
या सगळ्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज प्रकरणात कंगनाची चौकशी होईल असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. कंगनाविरोधात सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक या दोघांनीही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. या तक्रारीला उत्तर देताना ड्रग्ज प्रकरणात कंगनाची चौकशी होईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.