Coronavirus Maharashtra Update l राज्यात आज ९ हजार ३३६ नवीन कोरोनाबाधित वाढले

आज राज्यात ३ हजार ३७८ रूग्ण कोरोनातून बरे झाले, १२३ रूग्णांचा मृत्यू

maharashtra-reports-9336-new-covid-cases-and-123-deaths-in-the-past-24-hours-news-update
maharashtra-reports-9336-new-covid-cases-and-123-deaths-in-the-past-24-hours-news-update

मुंबई l राज्यात आज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार ३७८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज १२३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४८,६९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,२३,०३० करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२५,४२,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,९८,१७७ (१४.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३८,००४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार १९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२३,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 हेही वाचा :

Mohan Bhagwat l’स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा’; मोहन भागवतांचं मोठं विधान

बापरे! प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकारकडून 16 महिन्यात 155 कोटी रुपयांचा चुराडा

विरोधकांना महाराष्ट्राची चिंता असेल तर त्यांनी अधिवेशन चालू द्यावं; राऊतांचा भाजपला सल्ला

Rafale Deal Scandal l राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे ?

Petrol-Diesel Price Today: आज फिर महंगा हुआ पेट्रोल-डीजल, रिकॉर्ड स्तर पर पहुंची कीमतें !

राफेल डील पर राहुल का सवाल- जांच से बचना चाहते हैं मोदी, क्योंकि मित्रों को बचाना है; फोटो शेयर कर लिखा- चोर की दाढ़ी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here