”CM उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ कळवा,1001रुपये मिळवा’’;मनसेचा टोला

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा ट्विटरवरून निशाणा

mns-sandip-deshpande-criticized-on-cm-uddhav-thackeray-speech
mns-sandip-deshpande-criticized-on-cm-uddhav-thackeray-speech

मुंबई l ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या CM Uddhav Thackeray भाषणाचा अर्थ कळवा 1001 रुपयाचं बक्षिस मिळवा’, असे ट्विट् मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरेकारशेड ते कृषी विधेयक तसेच लोकल रेल्वेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पण यातलं काहीच कळलं नसल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय परिस्थिती आहे. काळजी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावं लागेल असं सांगितलं. तसेच लोकलसह इतर विषयांवर भाष्य केलं. मनसेने या सर्व विषयांवरुन महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

वाचा l Hathras rape case l पीडित कुटुंब लखनऊला रवाना; आज हायकोर्टात सुनावणी

लोकल सुरू करण्याच्या मुद्दा मनसेनं उचलून धरला आहे. यासाठी वारंवार सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणालाही मनसेकडून लक्ष्य करण्यात आलं आहे.

‘राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने पेशंटची वाट लावली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात 21 ऑक्टोबरला रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू तर दुसरीकडे राजेश टोपे म्हणतात नोव्हेंबर अखेरीस सर्व सुरू होईल. म्हणजेच या सरकारमध्ये समन्वय नाही’ अशी टीका यावेळी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना गर्दी नको असेल तर त्यांनी घरातच थांबावं. मात्र, सर्वसामान्य जनतेला कामावर जायचं आहे. बँकेचे हफ्ते भरायचे आहेत. याकडे लक्ष कोण देणार? असा थेट सवाल यावेळी संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आला आहे.

ऐका काय म्हणाले मुख्यमंत्री

दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर याआधीही संदीप देशपांडे यांनी घणाघाती टीका केली आहे. ‘तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरू करत आहात. एक-एक आस्थापना सुरू करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं. शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here