मुंबई l पुरेशा लससाठाअभावी शुक्रवारी मुंबई महापालिकेची लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आज शनिवार व उद्या रविवार लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता थेट सोमवारची वाट पाहावी लागणार आहे. No-covid-19-vaccination-on-saturday-and-sunday
मोदी सरकार एकीकडे एकदिवसातल्या लसीकरणाच्या विक्रमाचा गाजावाजा करीत असताना, दुसरीकडे देशात लशींच्या तुटवड्याअभावी केंद्रांवर लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लशींअभावी महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेनं अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.
Dear Mumbaikars,
All BMC and Government vaccination centers will remain closed on July 10, 2021.
Similarly, CVCs will be closed on July 11, as it is a Sunday.
We apologize for the inconvenience caused.
Follow this space for updates regarding vaccination in Mumbai. https://t.co/l0zeECpQi9
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 9, 2021
आज १० जुलै रोजी मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. तसंच, ११ जुलै रोजी साप्ताहिक सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहिल, असं ट्वीट मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. तसंच, लसीकरण प्रक्रियेच्या पुढील सूचना आम्ही देत राहू, असं मुंबई पालिकेनं म्हटलं आहे. त्यामुळं शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लसीकरण बंद राहणार आहे.
दरम्यान, मुंबईत आतापर्यंत ५९ लाख २९ हजार जणांनी लस घेतली आहे. त्यापैकी, ४६ लाख ८१ हजार ७८० जणांनी लशींची पहिली मात्रा घेतली आहे. त्याचप्रमाणे १२ लाख ४७ हजार ४१० जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
मुंबईबरोबरच नाशिक, औरंगाबाद शहरातही लस तुटवडा असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये लशीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद राहील असे फलक आठवड्यातून किमान तीन-चार दिवस लावण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणांवर ओढावते आहे. आज ना उद्या लस मिळेल या आशेने नागरिक लसीकरण केंद्रावर जात आहेत. परंतु, लसीकरण केंद्र बंद असल्याने व लस केव्हा उपलब्ध होईल, याची निश्चित माहिती मिळत नसल्याने नागरिकांना निराश होऊन माघारी परतावे लागते आहे.