NCP: ‘राष्ट्रवादी’ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; वाचा कोणकोणत्या नेत्यांना मिळाली संधी!

national-executive-of-nationalists-announced-national-president-pawar-vice-president-patel-chief-general-secretary-tatkare-news-update-today
national-executive-of-nationalists-announced-national-president-pawar-vice-president-patel-chief-general-secretary-tatkare-news-update-today

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज शुक्रवार (ता.१६) सप्टेंबर २०२२ रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल, जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनील तटकरे यांची निवड जाहीर झाली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरीपदी खासदार सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नरेंद्र वर्मा यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची निवड झाली आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मीडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here