नीरव मोदीची बहिण आणि मेहुणा होणार माफीचे साक्षीदार

कोर्टात दाखल केला अर्ज,नीरवनं आमचं जीवन उद्ध्वस्त केल्याची दिली माहिती

nirav-modis-sister-and-her-husband-to-witness-apology-application-filed-in-mumbai-ED-court
nirav-modis-sister-and-her-husband-to-witness-apology-application-filed-in-mumbai-ED-court

मुंबई l पीएनबी PNB घोटाळ्यातील प्रमुख आरोपी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला Nirav-modi चांगलाच दणका बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ED दाखल केलेल्या खटल्यांमध्ये आता नीरवची छोटी बहिण आणि मेव्हण्याने त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात या दोघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल झाला असून तो कोर्टाकडून मंजुरही करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात नीरवची बहिण पूर्वी मेहता आणि त्यांचे पती मयंक मेहता यांनी कोर्टात समोर एक अर्ज सादर केला होता. या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की, त्यांना नीरव मोदीपासून दूर रहायचं आहे.

तसेच त्याच्या आणि त्याच्या व्यवहारांशी संबंधित काही महत्वाचे आणि पक्के पुरावे देऊ शकतो. पूर्वी यांच्याकडे बेल्जिअमची नागरिकता असून त्यांचे पती मयंक हे ब्रिटीश नागरिक आहेत.

दोघांच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं की, नीरव मोदीच्या कथीत गुन्हेगारी कृत्यांमुळे त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनाला मोठा फटका बसला आहे.

त्यामुळे आम्ही ईडीशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या दोन प्रकरणांध्ये साक्षीदार बनू इच्छितो. त्याचबरोबर असे काही खुलासे करु शकतो जे नीरव आणि इतर आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यात महत्वाचे ठरु शकतात.

करोनाच्या संकटामुळं लावण्यात आलेले प्रतिबंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर लागलेल्या बंदीमुळे भारतात येऊ शकलो नाही. पण आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोरही आपला जबाब देऊ शकतो.

यह भी पढ़ें : Co-WIN App: कोरोना वैक्सीन के लिए कैसे होगा रजिस्ट्रेशन, यह दस्तावेज जरूरी

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये देखील ईडीला दिलेल्या जबाबात दोघांनी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याबाबत म्हटलं होतं, असंही पूर्वी आणि मयंक यांनी आपल्या अर्जात म्हटल आहे.

यह भी पढ़ें : Badaun Gang  Rape : UP में महिला के साथ ‘निर्भया’ जैसी हैवानियत, गैंगरेप के बाद प्राइवेट पार्ट में रॉड डालकर हत्या!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here