OPPO F19 स्मार्टफोन कमी किंमतीत, 48MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी

oppo-f19-with-triple-rear-cameras-and-33w-fast-charging-check-price-specifications-updates
oppo-f19-with-triple-rear-cameras-and-33w-fast-charging-check-price-specifications-updates

स्मार्टफोन कंपनी Oppo ने भारतात आपल्या एफ सीरिजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने Oppo F19 हा स्मार्टफोन आणला आहे. Oppo F19 मध्ये 5000mAh बॅटरी, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 128 जीबी स्टोरेज असे फिचर्स आहेत. मोठ्या बॅटरीसोबत या फोनमध्ये फुल एचडी+ एमोलेड डिस्प्लेही आहे. जाणून घेऊया Oppo F19 चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत oppo-f19-with-triple-rear-cameras-and-33w-fast-charging-check-price-specifications-updates

Oppo F19 स्पेसिफिकेशन्स 
ओप्पो एफ19 मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले असून स्मार्टफोनच्या स्क्रीनवर फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच-होल डिझाइन आहे. ओप्पोचा हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर कार्यरत आहे, तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे.

हा फोन 6 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह आलाय. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे. ओप्पो एफ19 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक यांसारखे शानदार फिचर्सही आहेत. तर, फोटोग्राफीसाठी कंपनीने ओप्पो एफ19 मध्ये ट्रिपल-रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.

यातला 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 2 मेगापिक्सेल (डेप्थ) आणि 2 मेगापिक्सेल (मॅक्रो सेन्सर) क्षमतेचे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर आहे.

OPPO F19 ची किंमत
ओप्पो एफ19 स्मार्टफोनला 18 हजार 990 रुपयांमध्ये भारतात लाँच करण्यात आले आहे. 9 एप्रिलपासून Oppo F19 ची भारतात विक्री सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here