नवी दिल्ली : भारतानं कोरोनाबाधितांच्या संख्येचा ५० लाखांचा टप्पा पार केला. भारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोना, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर, सीमेवर चीनची घुसखोरी या सगळ्या मुद्दयांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला. कोरोना कालावधीमधील भाजपाचे ते ‘खयाली पुलाव’ असं म्हणत, त्यांची एक यादीच सादर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “२१ दिवसांमध्ये कोरोनावर मात करु असं सांगितलं होतं. तसेच आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करा संरक्षण होईल असं जाहीर कार्यक्रमात देशवासियांना सांगितलं होतं. त्यानंतर २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. परंतु त्याचा लाभ होताना दिसत नाही. जनतेमध्ये त्याबाबतही नाराजी आहे. आत्मनिर्भर व्हा असं पंतप्रान मोदींनी सांगितलं होतं. त्यावरूनही जनतेने त्याची खिल्ली उडवली होती. केंद्र सरकारने चीनकडून घुसखोरी झाली नाही असा दावा केला होता. परंतु संरक्षण मंत्री यांनी चीनने घुसखोरी केल्याचे संसदेमध्ये सांगितलो
सत्य होतं की संकटातील संधी
काँग्रेस नेते यांनी केंद्रावर निशाणा साधत, ट्विटव्दारे केंद्राला सवाल केले आहे. “२१ दिवसांमध्ये करोनावर मात करु, आरोग्य सेतू अॅपमुळे संरक्षण होईल, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी यादी राहुल गांधी यांनी शेअर केली आहे. तसंच ही यादी शेअर कर ते एक सत्य होतं की संकटातील संधी असा सवालही त्यांनी केला आहे.