
शाळेत जायचा आणि अभ्यास करायचा काही मुलांना कंटाळा येतो. त्यामुळे ते दररोज नवनवीन कारणं शोधतात. पण काही शिक्षक शिकवण्याच्या पद्धतीलाच इतकी मनोरंजक करतात की लहान मुलांना अभ्यासाचा कंटाळा वाटत नाही. अशा शिक्षकांमुळे लहान मुलांना अभ्यासाचे दडपण येत नाही आणि त्यांच्या सर्व गोष्टी लक्षातही राहतात. असाच एक गाण्यातून बाराखडी शिकवताना व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडीओमधील शिक्षक गाण्यातून विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवत आहेत. त्यांची की कल्पना इतकी उत्तम आहे की आपल्याला ही व्हिडीओ पाहताना त्यांच्यासोबत गावे असे वाटते. त्यांचे विद्यार्थी या पद्धतीने बाराखडी शिकण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. अशाप्रकारे गाण्यातून मुलांना शिकवल्याने त्यांना बाराखडी पटकन लक्षात राहील आणि अभ्यासाचे टेन्शनही येणार नाही. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
क्या शानदार तरीका है पढ़ाने का👌बढ़िया गुरु जी… pic.twitter.com/Kkw8DDDYln
— अंकित यादव बोझा (@Ankitydv92) November 7, 2022
हा व्हिडीओ अंकित बोझा या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या शिक्षकाच्या बाराखडी शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.