मुंबई: राज्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट Rapid- Antigen- Detection -Test करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉल Mall, पर्यटन स्थळे Picnic Center, रेल्वे स्थानके Railway station , एसटी आगार ST stand, बाजार Market, उपाहारगृहे Hotel या ठिकाणी कोरोनाच्या प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत.
प्रत्येक मॉलमध्ये दर दिवशी ४०० चाचण्या
प्रत्येक मॉलमध्ये दर दिवशी ४०० चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांना त्यांच्याच खर्चाने करोना चाचणी करावी लागणार आहे. चाचण्या करण्यास किं वा खर्च देण्यास नकार देणाऱ्यांवर साथरोग कायद्यांतर्गत कारवाई के ली जाणार आहे.
दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य
दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांना दर दिवशी किती चाचण्या के ल्या याचा अहवाल देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईत एकू ण २७ मॉल आहेत. प्रत्येक मॉलमध्ये ४०० चाचण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे, मुंबई सेंट्रल, परेल, बोरिवली, कुर्ला असे चार एसटी डेपो आहेत, तर छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, लोकमान्य ठिळक टर्मिनस, कुर्ला अशी सात रेल्वे स्थानके आहेत जिथे परराज्यांतून गाड्या येतात. या ठिकाणी दर दिवशी १००० चाचण्या के ल्या जाणार आहेत.
लसीकरणाच्या तारखेची वाट न पाहता थेट लस घ्या!
कोविन अॅपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या तारखेची वाट न पाहता, नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी, तसेच नोंदणी केली नसेल तरी नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत महानगरपालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये नि:शुल्क लस दिली जात आहे. तर सध्या ५९ खासगी रुग्णालयांमध्येही रुपये २५० या दराने सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
बोरिवली, कुर्ला परिसरात सर्वाधिक चाचण्या
पालिके च्या विभाग कार्यालयांनी आपल्या हद्दीतील रेल्वे टर्मिनस, मॉल, एसटी डेपो तसेच गर्दीची ठिकाणे येथे चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यानुसार दिवसभरातील सर्वाधिक चाचण्या या बोरिवलीत आणि कु र्लामध्ये प्रत्येकी ३८००, तर त्याखालोखाल ग्रँट रोडचा भाग असलेल्या डी विभागात ३६०० चाचण्या दर दिवशी कराव्या लागणार आहेत.