इन्फल्यूएंझा ए H3N2 रुग्णांमध्ये वाढ, ‘ही’ आहेत लक्षणे, अशी घ्या काळजी!

Increase in influenza A H3N2 patients, these are the symptoms, be careful!
Increase in influenza A H3N2 patients, these are the symptoms, be careful!

औरंगाबाद : राज्यात इन्फल्यूएंझा ए H3N2 चे रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहर व परिसरात H3N2 चे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. पण प्रत्येक फल्यू हा इन्फल्यूएंझा ए H3N2 नसतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नये. H3N2 पासून स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे संरक्षण करावे.

  • इन्फल्यूएंझा ए H3N2 प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • हा आजार  कशामुळे होतो? 
  • हा विषाणू मुळे होणारा आजार आहे.
  • याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो
  • लक्षणे…
  • ताप, घसा दुखी, खोकला, नाक गळणे
  •  श्वास घेण्यास त्रास होणे.
  • या करिता उपाय योजना म्हणून 
  • गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
  • वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
  • खोकताना व शिकताना हातरुमाल वा कपडयाने तोंड झाकुन घ्या.
  • आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवून काढा.
  • खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची इन्फल्यूएंझाची लक्षणे आढळून येणा-या बाधित
  • व्यक्तीपासून हातभराच्या अंतरावर राहा.
  • पौष्टिक आहार घ्या व भरपूर पाणी प्या.
  • धुम्रपान टाळा.
  • लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्य दायी पदार्थाचा आहारात वापर करावा.
  • पुरेशी झोप व विश्रांती घ्या.
  • डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
  • हे करु नका…
  • हस्तांदोलन.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका..
  • खालील अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये H3N2 होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो…
  • १.पाच वर्षाखालील मुले
  • २. ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरीक.
  • ३.गरोदर माता
  • ४.मधुमेह स्थूलत्व
  • ५. उच्च रक्तदाब किंवा इतर ह्दयरोग
  • ६. चेतासंस्थेचे विकार असणा-या व्यक्ती
  • ७. फुप्फुस, यकृत मुत्रपिंड यांचे आजार असणा-या व्यक्ती
  • ८.दिर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणा-या व्यक्ती, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती
  • H3N2 संक्षयित रुग्ण यांनी महानगरपालिकेच्या अथवा शासकीय रुग्णालयात जावून H3N2 ची स्वॅब तपासणी व औषधोपचार करुन घ्यावे, सदरील आजारावरील औषधोपचार महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावर उपलब्ध आहेत.
  • गेल्या १० दिवसांमध्ये H3N2 बाधित रुग्णासोबत सहवास आला असेल व तुमच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचे लक्षणे आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रास संपर्क साधा.
  • साथरोग २४ तास नियंत्रण कक्ष फोन क्र. ०२४०-२३३३५३६ ते ४० विस्तारित क्र. २५० (जन्म मृत्यू खिडकी) ई-मेल fwsipamcabd@yahoo.co.in
  • H3N2 हा Notifiable आजार असल्यामुळे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी २४ तासाच्या आत महानगरपालिकेस कळवावे असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here