Salman khan l सलमान खान धावला ‘मेहंदी’ फेम अभिनेता फराजच्या मदतीला

सलमान खान फराजच्या वैद्यकीय बिलाचा 25 लाख रुपये खर्च उचलणार

salman-khan-pay-all-medical-bills-of-faraaz-khan-who-are-admits-in-a-hospital-in-critical-condition
salman-khan-pay-all-medical-bills-of-faraaz-khan-who-are-admits-in-a-hospital-in-critical-condition

मेहंदी, फरेब फेम अभिनेता फराज खान faraaz-khan सध्या मृत्यूशी संघर्ष करत आहे. फराजला मागील एक वर्षापासून खोकला आणि छातीत संसर्ग झाला होता. त्याच्यावर बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फराजच्या उपचारासाठी 25 लाखांचा खर्च येत असून, सर्व वैद्यकीय खर्च सलमान खान salman-khan-pay-all-medical-bills उचलणार आहे. अशी माहिती कश्मिरा शाह हिने सोशल मीडियावर दिली आहे.  

कुटुंबीयांनी केले होते आर्थिक मदतीचे आवाहन

फराजचे faraaz-khan नातेवाईक फहाद अबाउशर आणि अहमद शमून यांनी फंड-राइजर वेबसाइटद्वारे लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांनी लिहिले होते.माझा प्रिय भाऊ, मित्र आणि प्रिय कलाकार आज जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे.

त्याने आपली बरीच वर्षे कलाविश्वाला दिली आहेत आणि कॅमेरासमोर सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज त्याला जगण्यासाठी मदतीची गरज आहे. कृपया फराजच्या उपचारांसाठी शक्य तितकी मदत करा.

फराजला मागील एक वर्षापासून खोकला आणि छातीत संसर्ग झाला होता. अलीकडे, जेव्हा त्याचा खोकला अचानक वाढला तेव्हा त्याने व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेतला. 8 ऑक्टोबर रोजी जेव्हा डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहिली तेव्हा त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.

पाहा liphone 12 लाँच, पाहा किंमती आणि फिचर्स

यानंतर आम्ही रुग्णवाहिका बोलविली. तथापि, नंतर जे घडले ते आम्हाला हादरवून टाकणारे होते. रुग्णवाहिका वाटेत असताना फराजला झटका आला आणि तो अचानक अनियंत्रित होऊन हलू लागला. जेव्हा रूग्णवाहिका घरी पोहोचली आणि त्याला स्ट्रेचरवर ठेवण्यात आले, तेव्हा पुन्हा त्याला झटका आला.

यानंतर विक्रम हॉस्पिटलकडे जाताना वाटेत त्याला तिसरा झटका आला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला कळले की छाती मधील इन्फेक्शन त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचले आहे आणि त्यामुळे त्याला एकामागून एक झटके आले.

कश्मिराने लिहिले…

सलमान खानचा faraaz-khan एक फोटो शेअर करताना कश्मिराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ”तुम्ही खरोखर महान व्यक्ती आहात. फराज खानच्या तब्येतीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. ‘फरेब’ फेम अभिनेता फराज खानची faraaz-khan प्रकृती चिंताजनक आहे आणि सलमान खान त्याच्यासोबत उभे आहेत.

वाचा l भाजपच्या दुखणा-या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही;संजय राऊतांचा टोला

इतरांप्रमाणेच त्याला मदत करत आहेत. मी सलमानची एक खरी चाहता आहे आणि नेहमीच असेल. जर काहींना ही पोस्ट आवडली नसेल, तर यामुळे मला काही फरक पडत नाही. मला अनफॉलो करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. माझ्या मते, मी आतापर्यंत या इंडस्ट्रीत जेवढ्या लोकांना भेटली, त्यात ते (सलमान) सर्वात खरी व्यक्ती आहे.”

 उपचारासाठी 25 लाख रुपयांची गरज

फराजच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार, डॉक्टरांनी फराजला 7-10 दिवस क्रिटिकल यूनिटमध्ये ठेवण्यास सांगितले, ज्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येईल. फराज यांनी बर्‍याच वर्षांपासून चित्रपटात काम केले नाही. त्याच्यासाठी 25 लाख रुपये ही मोठी रक्कम आहे. फराजला faraaz-khan आवश्यक उपचार दिल्यास तो बरा होऊन आपले सामान्य जीवन जगू शकेल, असे फराजच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here