Shivbhojan Thali Yojana: शिवभोजन चालकांची थाळी चार महिन्यांपासून रिकामीच!

महागाईमुळे अनुदान पुरत नसल्याची व्यक्त केली खंत

औरंगाबाद: शिवभोजन थाळीला Shivbhojan Thali Yojana आता अनुदानामुळे घरघर लागण्याची भीती शिवभोजन चालकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारकडून गेल्या साडेचार महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. थाळीमागे जे अनुदान मिळते तेही आता परवडत नाही. अनुदान रखडल्यामुळे सध्यातरी शिवभोजन चालकांची थाळी रिकामीच असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

कष्टकरी, मोल-मजुर आणि गरीबांच्या पोटाला पोटभर अन्न मिळावे या हेतूने शिवभोजन थाळी केंद्र राज्यभर सुरु करण्यात आले. परंतु जिल्ह्यातील १०० शिवभोजन थाळी केंद्रांचे चार महिन्यांपासून अनुदान रखडले आहे. त्यामुळे केंद्रचालकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर येथे १०० शिवभोजन थाळी केंद्र आहेत. तर तीन महिन्यांपूर्वी ३० नवीन केंद्र सुरु झाले. त्यांनाही तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. हे विशेष. त्यामुळे केंद्र चालक अडचणीत आले आहेत. शिवभोजन थाळीत दोन वेळा जेवनाची व्यवस्था व्हावी, अशीही मागणी संघटनेच्या वतीने यापूर्वी मुख्यमंत्री,पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे. परंतु शासनाकडून त्याची दखल अद्याप घेतली नाही.

बिले पाठवले आहेत…  

बिले पाठवले आहेत. यापूर्वीची बिले तयार आहेत. काही नवीन चालकांची अडचण असेल किंवा काही चालकांना अडचण असेल तर त्यांनी प्रत्यक्ष भेटावे. ऐपची अडचण नेहमी होत नाही. सर्व्हेरची एखाद्या वेळेस अडचण होऊ शकते.

वर्षाराणी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी….

काय म्हणतात शिवभोजन चालक…

शिवभोजन केंद्र २०१९-२०मध्ये जेव्हा सुरु झाले तेव्हा पालेभाज्या, तेल, गहू, तांदूळ, गॅसचे भाव कमी होते. आता भाव वाढ झाल्यामुळे केंद्र चालवने अवघड झाले आहे. शासनाकडून एका थाळीमागे ४० रुपये तर ग्राहकांकडून १० रुपये आम्हाला मिळतात. शासनाकडून अनुदानात वाढ झाली पाहिजे. काही ग्राहक तर आम्हाला दहा रुपये सुध्दा देत नाही.

हे नियम पाळावे लागते…

>>प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर.

 >>केंद्राच्या क्षमतेनुसार संख्या असावी.

>>प्रत्येक कॅमे-यात शिवभोजन दिसायला हवे.

>>केंद्र चालकाने कमीतकमी ३० दिवसांचे फुटेज तपासणीसाठी उपलब्ध होईल,याची दक्षता घ्यावी.

>>आवश्यकता भासेल, तेव्हा हा सर्व डाटा तपासणीसाठी पेन ड्राइव्ह मधून अधिका-याना द्यावा.

>>वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करुन अखंड फुटेज मिळेल,याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र चालकाची राहिते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here