मुंबई : संजय राऊत यांनी भाजपाचं नाव न घेता टीका करताना मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालत आहेत त्या राजकीय पक्षांना मुंबई, महाराष्ट्रात मतं मागण्याचा अधिकार नाही. ही लोकं जी निवडून आली आहेत त्यांना काय पाकड्यांनी मतदान केलं आहे का ? याचा खुलासा त्या पक्षाकडून होणं गरजेचं आहे. अशी मागणी केली.
मुंबईला पाकिस्तान म्हणताना लाज वाटली पाहिजे. मुंबईचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला येथे राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही,” असं म्हटलं आहे. भाजपा नेत्यांकडून कंगनाचा उल्लेख झाशीची राणी असा केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “हा झाशीच्या राणीचा सगळ्यात मोठा अपमान आहे. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता आहे. आमची प्रेरणा आहे. महाराष्ट्राची वीरकन्या आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या टाकणाऱ्या स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि येथील राजकीय पक्ष जर झाशीच्या राणीचा अपमान करणार असतील तर देशाचं राष्ट्रीयत्व काही लोकांनी किती खालच्या स्तरावर नेऊन ठेवलं आहे हे स्पष्ट दिसतंय”. संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचं नाव घेणं टाळलं. “कोणत्याही राजकीय पक्षाने पाठबळ निर्माण करण्याच्या हेतूने अशा व्यक्तींच्या पाठीशी उभं राहू नये, ते बुमरँग होईल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.