मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांनी लेटर बॉम्ब Letter-bomb टाकून राजकीय स्फोट घडवला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण हे पूर्णपणे ढवळून निघाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहे. हे राजकीय वादळ सुरू असतानाच शिवसेना Shivsena नेते खासदार संजय राऊतांनी Sanjay Raut केलेल्या एका ट्विटमध्ये राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
‘हमको तो तलाश बस नए रास्तों की है ..हम हैं मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है…’
संजय राऊत वाद निर्णाम झाल्यानंतर ट्विटच्या माध्यमातून आपले मत मांडत असतात. यामध्येही ते शायरीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. राज्यातील वातावरण हे ढवळून निघालेले असताना आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असताना राऊतांनी एक शायरी पोस्ट केले आहे.
शुभ प्रभात… pic.twitter.com/lKWKS9pFkf
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 21, 2021
‘हमको तो तलाश बस नए रास्तों की है ..हम हैं मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है…’ संजय राऊत यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. या ट्विटमधून राऊत यांना नेमके काय म्हणायचे? या ट्विटमधून राऊत काय संकेत देत आहेत. या ट्विटला अनुसरुन काही नवीन घडामोडी पुढे राजकारणात घडणार आहेत का असे अनेक अंदाज सध्या बांधले जात आहेत.
[…] ‘तलाश नए रास्तों की है..’ संजय राऊता… […]