जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा ते उघडा सांगणाऱ्यांवर नाही; उध्दव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

the-responsibility-of-the-people-is-on-me-not-on-who-says-open-evertything-says-cm-uddhav-thackarey
the-responsibility-of-the-people-is-on-me-not-on-who-says-open-evertything-says-cm-uddhav-thackarey

मुंबई l कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून याबाबत खबरदारी घेतली जात आहे. कारण जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे, हे उघडा ते उघडा असं सांगणाऱ्यांवर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. सोशल मीडियातून लाईव्ह संभाषणादरम्यान, ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे अजूनही आपण शाळा उघडू शकलेलो नाही, याबाबत निर्णय घेतला आहे. पण अजूनही शाळा उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे. कारण जर शालेय विद्यार्थी आजारी पडले, त्यांचे शिक्षक आजारी पडले त्यांच्यामुळे विद्यार्थीही आजारी पडतील.

त्यामुळे काळजी घेत घेत आपण पुढे जात आहोत. बाकीच्यांच ठीक आहे, पण मला यात राजकारण आणायचं नाही. कारण ते म्हणताहेत हे उघडा ते उघडा पण याची जबाबदारी घेता का?” असा सावलही यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना केला.

“जनतेची जेवढी जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवरती नाही. मी जसं आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी प्रार्थनागृह उघडले पण ती उघडली म्हणजे तिथं गर्दी करु नका,” असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

 काय म्हणाले उद्धव ठाकरे

  1.  मी सांगितल्याप्रमाणे पाडव्याला सर्व धर्मांची प्रार्थना स्थळी उघडली.
  2.  कार्तिकी यात्रेला गर्दी करु नका.
  3.  सर्व सण संयमाने साजरे केले.
  4. उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली.
  5. सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला करोनाचा आकडा खाली आला.
  6. सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका.
  7. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला.
  8. गर्दी वाढली तरी करोना मरणार नाही, वाढणार आहे.
  9. ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
  10. लशीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे.
  11. २४ ते २५ कोटी जनतेला लशीकरण करायची गरज आहे.
  12. लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही,
  13. जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोल लगावला.
  14. अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा, ही मी कळकळीची विनंती करतो.
  15. लस येईल तेव्हा येईल, करोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा.
  16. गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी टाळा, मास्क लावण विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच करोना टाळण्याचे उपाय आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here